शुक्रवार, २३ मार्च, २०१८

आयुष्यमान भारत योजनेला केंद्राची मंजुरी - २२ मार्च २०१८

आयुष्यमान भारत योजनेला केंद्राची मंजुरी - २२ मार्च २०१८

* देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या 'आयुष्यमान भारत' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मार्च रोजी मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.

* या योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील १० कोटी कुटुंबाना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट होणार आहेत.

* या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीच आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.

* ग्रामीण भागात जे कुटुंब एकाच खोलीत राहते. आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे. ज्या कुटुंबाचा १६-५९ या वयोगटातील कुणीही नाही.

* ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे. असे कुटुंब, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब, यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.