शनिवार, ३१ मार्च, २०१८

२. विभाज्यतेचा कसोट्या

२. विभाज्यतेचा कसोट्या

१] २ ने निःशेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८, या पैकी कोणताही अंक असल्यास.

२] ३ ची कसोटी - संख्येच्या सर्व अंकाच्या बेरजेला ३ ने निःशेष भाग जात असल्यास. उदा - ५७८६४ = (५+७+८+४+६=३०) = ३०\३ = १०.

३] ४ ची कसोटी - संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ४ ने निःशेष भाग जात असल्यास. अथवा संख्येच्या शेवटी कमीत कमी दोन शून्य असल्यास. उदा - ३७५८८ या संख्येतील शेवटी कमीत कमी २ शून्य असल्यास.

४] ५ ची कसोटी - संख्येच्या एककस्थानचा अंक जर ० किंवा ५ असल्यास. उदा. २३४७८९०.

५] ६ कसोटी - ज्या संख्येला २ व ३ अंकांनी निःशेष भाग जातो. त्या संख्याना ६ ने निःशेष भाग जातोच. किंवा किंवा ज्या सम संख्येच्या अंकाच्या बेरजेला ३ ने भाग जातो. त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

६] ७ ची कसोटी - संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस ७ ने निःशेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ निःशेष भाग जातो. उदा - ६६९७८८ = ७८८-६६९=११९  ११९ ला ७ ने निःशेष भाग जातो म्हणून ६६९७८८ ला निःशेष भाग जातोच.

७] ८ ची कसोटी - संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ८ ने निःशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीत कमी तीन शून्य असल्यास त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. उदा - २७४२४८ या संख्येतील २४८ पैकी ४८ ला ८ ने भाग जातो म्हणून या संख्येला ८ ने निःशेष भाग जाईल.

८] ९ ची कसोटी - संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ९ ने निःशेष भाग जात असल्यास - उदा - ७५८३६७ या संख्येत [७+५+८+३+६+७ = ३६] ३६ ला ९ ने भाग जातो. म्हणून पूर्ण संख्येला ९ ने निःशेष भाग जातोच.

९] ११ ची कसोटी - ज्या संख्येच्या विषम स्थानच्या वा समस्थानच्या अंकाची बेरीज अथवा फरक ११ च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निःशेष भाग जातो.
एक सोडून एक अंकाची बेरीज समान. किंवा फरक ० वा ११ च्या पटीत असतो. उदा - २४२० या संख्येत २+२=४, ४+०=४ फरक =०.

१०] १२ ची कसोटी - ज्या संख्येला ३ व ४ या अंकांनी निःशेष भाग जातो, त्या संख्येला १२ ने निःशेष भाग जातो.

११] १५ ची कसोटी - ज्या संख्येला ३ व ५ या अंकांनी निःशेष भाग जातो,  त्या संख्येला १५ ने निःशेष भाग जातो.

१२] ३६ ची कसोटी - ज्या संख्येच्या अंकास ९ ने भाग जातो आणि ज्या संख्येतील शेवटच्या अंकांना ४ ने भाग जातो त्या संख्येस ३६ ने भाग जातो किंवा ज्या संख्येला ९ व ४ ने निःशेष भाग जातो, त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

१३] ७२ ची कसोटी - ज्या संख्येला ९ व ८ ने निःशेष भाग जातो, त्या संख्येला ७२ ने निःशेष भाग जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.