गुरुवार, ८ मार्च, २०१८

चंद्रबांबूचा टीडीपी एनडीएतुन बाहेर - ८ मार्च २०१८

चंद्रबांबूचा टीडीपी एनडीएतुन बाहेर - ८ मार्च २०१८

* आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी [टीडीपी] केंद्र सरकारमधून तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून केंद्रातील मोदी सरकारला हा मोठा झटका मानला जात आहे. 

* केंद्रीय मंत्रिमंडळातील तेलगू देसमचे दोन मंत्री गुरुवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांनी जाहीर केले.

* विशेष राज्याच्या मुद्यावरून नाराज असलेल्या तेलगू देसम पार्टीच्या एनडीए पासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

* चंद्रबाबूंचा हा निर्णय भाजपासाठी तगडा झटका असून दक्षिणेतील सर्वात मोठा मित्र भाजपाने गमावला आहे. टीडीपीकडून अशोक गणपती राजू आणि वाय.एस. चौधरी हे केंद्रात मंत्री असून ते गुरुवारी राजीनामा देणार आहेत.

* केंद्र सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पाळले गेले नाही. गेल्या ४ वर्षात केंद्र सरकारने हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल केली नाही.

* या प्रमुख कारणामुळे टीडीपीने केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.