शुक्रवार, १६ मार्च, २०१८

१४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनला ब्राँझ - १६ मार्च २०१८

१४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनला ब्राँझ - १६ मार्च २०१८

* चीनमधील गुयांग येथे रविवारी झालेल्या १४ व्या आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताच्या संजीवनी जाधवने महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेत महिला गटात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

* भारताने सांघिक महिला ब्राँझपदकही जिंकता आले. नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याऱ्या संजीवनीने शर्यत २८ मिनिटे १९ सेकंदात पूर्ण केली.

* गेल्या ९ महिन्यातील हे तिचे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक होय. भुवनेश्वरला आशियाई स्पर्धेत पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझ, तर सप्टेंबर महिन्यात तुर्कमेनिस्तान आशियाई माईन डोअर स्पर्धेत तीन हजार मीटर शर्यतीत रौप्य अशी कामगिरी तिने केली.

* पुण्याच्या स्वाती गाढवेने ११ वे तर रेल्वेच्या जुमा खातूनने १४ वे स्थान मिळविले. या तिघीमुळे भारताला सांघिक ब्राँझ मिळाले.

* आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताला १९९१ पासून यापूर्वी फक्त चार वैयक्तिक पदके. १९९३ मध्ये दिनेश कुमारला १२ किमी शर्यतीत रौप्य.

* २००७ स्पर्धेत सुरेंद्र सिंगला १२ किमी शर्यतीत रौप्य, याच स्पर्धेत २० वर्षाखालील मुलीच्या ६ किमी शर्यतीत नागपूरच्या मोनिका आणि रोहिणी या राऊत भगिनीना सुवर्ण पदक मिळाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.