गुरुवार, २९ मार्च, २०१८

महाराष्ट्र राज्याची ईनाम योजना - २९ मार्च २०१८

महाराष्ट्र राज्याची ईनाम योजना - २९ मार्च २०१८

* महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव योजना [ईनाम] योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* या योजनेची वैशिष्ट्ये - शेतमालाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारातच संगणकावर नोंद, शास्त्रोक्त पद्धतीने शेतमालाची गुणवत्ता तपासणी, लिलाव ऑनलाईन पद्धतीने, शेतकऱ्याच्या बँक खात्यात तात्काळ पैसे जमा होण्याची सुविधा.

* लिलाव प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता, सुसूत्रता व अधिक स्पर्धा, शेतकऱ्यांना मिळणार रास्त भाव, विहित दरानेच अडत व इतर खर्चाची कपात, लिलाव जलद होऊन सर्व घटकांच्या वेळेत बचत, अडते/व्यापारी/बाजार समिती/ शेतकरी यांना समन्वय ठेवणे सुलभ सर्व व्यवहार नोंदणीकृत झाल्याने बाजार समित्यांमध्ये देखील उत्पन्न वाढणार.

* पहिल्या टप्प्यातील बाजार समित्या - वर्धा, दौड, वरोरा, नागपूर, अहमदनगर, नंदुरबार, कोल्हापूर, मलकापूर, वणी, परभणी, लोणार, अकोला, लातूर, औरंगाबाद, तुमसर, शिरूर, नेवासा, येवला, अर्जुनी मोरगाव, सेलू, अचलपूर, वसमत, मालेगाव, गेवराई, आटपाडी, सांगली, भोकर, अहेरी, बार्शी, धुळे.

* दुसऱ्या टप्प्यातील बाजारसमित्या - मंगळूरपीर, मुर्तिजापूर, अमरावती, दर्यापूर, शेगाव, खामगाव, अंजनगाव सुर्जी, लोणार, वैजापूर, हिंगोली, मेणगाव, कराड, बीड, उदगीर, चंद्रपूर, गोंदिया, काटोल, राहुरी, शिरपूर, दोंडाईचा, चोपडा, शहादा, पिपळगाव बाजार, नाशिक अमळनेर, पुणे, खेड, जुन्नर, सोलापूर, मुंबई.

* जागतिक बँक प्रकल्प टप्प्यातील बाजारसमित्या - हिंगणघाट, अकोट, चिखली, धामणगाव रेल्वे, राहता, इंदापूर, अकलूज, दिंडोरी, तासगाव, जालना, सिंद्री, धर्माबाद, जामखेड, नांदेड, मेहकर, चांदूरबाजार, बारामती, चांदवड, सांगोला, संगमनेर, दुधनी, लासलगाव, फलटण, पंढरपूर, जिंतूर.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.