शनिवार, ३१ मार्च, २०१८

३] सरासरी/व्यवहारी अपूर्णांक

३] सरासरी

* n संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज\n , n = नैसर्गिक संख्या जसे १,२,३,४, . . . .  . . .

* क्रमशः संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. उदाहरणार्थ - १२, १३, १४, १५, १६ या संख्यांची सरासरी = १४. संख्यामाला दिल्यावर ठराविक संख्यांची [n] सरासरी काढण्यासाठी.
उदा - n या क्रमशः संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या)/n

४] व्यवहारी अपूर्णांक

१] व्यवहारी अपूर्णकांत छेद म्हणजे वस्तूचे केलेले समान भाग आणि अंश म्हणजे त्यापैकी घेतलेले काही भाग. उदा - २/५ मध्ये २ हा अंश आणि ५ हा छेद आहे.

२] अंशाधिक अपूर्णांकात अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. आणि अंशाधिक अपूर्णांकांची किंमत १ पेक्षा मोठी असते. उदा - ३/५ = ०.६.

३] छेदादिक अपूर्णांकात छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. आणि छेदादिक अपूर्णांकांची किंमत १ पेक्षा लहान असते. उदा - ३/५ = ०.६

४] छेदाला व अंशाला एकाच संख्येने गुणल्यास वा भागल्यास येणारी संख्या त्या अपूर्णांक समतुल्य अपूर्णांक येतो.

५] व्यवहारी अपूर्णांकातील दिलेल्या धन अपूर्णांकाचे अंश समान असतील तर, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. उदा - १/३, १/४, १/५.

६] व्यवहारी अपूर्णांकातील दिलेल्या धन अपूर्णांकाचे छेद समान असतील तर, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो.

७] दिलेल्या छेदाधिक अपूर्णकांतील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल तर, ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो.

८] दिलेल्या अंशाधिक अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यात समान फरक असेल तर, त्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

९] दिलेल्या अपूर्णांकातील प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकाने कमी असेल तर, ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

१०] दिलेल्या अपूर्णांकातील प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकाने जास्त असेल तर, ज्याचा अंश  व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो.

११] अपूर्णांकाचा उतरता क्रम - लावताना प्रथम दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक, त्यानंतर क्रमाने लहान अपूर्णांक लिहिणे.

१२] अपूर्णांकांचा चढता क्रम - लावताना प्रथम दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांक, त्यानंतर क्रमाने मोठे अपूर्णांक लिहिणे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.