शनिवार, ३ मार्च, २०१८

जागतिक विद्यापीठामध्ये एमआयटी विद्यापीठ अव्वल - ३ मार्च २०१८

जागतिक विद्यापीठामध्ये एमआयटी विद्यापीठ अव्वल - ३ मार्च २०१८

* क्वाकक्वारेली सायमंड या संस्थेने २०१८ मधील जागतिक पातळीवरील उत्कृष्ट विद्यापीठाची क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सलग सहाव्या वर्षी बाजी मारली.

* जगातील ९५० उत्कृष्ट विद्यापीठामध्ये एमआयटी यंदाही प्रथम क्रमांकावर झळकत आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिली चारही विद्यापीठे अमेरिकेतील आहेत.

* ब्रिटनमधील विद्यापीठांची घसरण सुरूच असल्याचे या वर्षीही दिसून येते. भारतातील नऊ विद्यापीठांना या यादीत स्थान मिळाले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी दिल्लीतील तंत्रशिक्षण संस्थेला १७२ वे स्थान मिळाले आहे.

* जगातील टॉप टेन विद्यापीठे - १] मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, २] स्टॅनफर्ड विद्यापीठ, ३] हार्वर्ड विद्यापीठ, ४] कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,  ५] केम्ब्रिज विद्यापीठ, ६] ऑक्सफर्ड विद्यापीठ, ७] कॉलेज ऑफ लंडन विद्यापीठ, ८] इंपेरियल कॉलेज लंडन ९] शिकागो विद्यापीठ १०] ईटीएच झुरिच स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

* भारतातील उत्कृष्ट विद्यापीठ - १] आयआयटी दिल्ली २] आयआयटी मुंबई ३] आयआयएस्सी बंगलोर ४] आयआयटी मद्रास ५] आयआयटी कानपुर ६] आयआयटी खडकपूर ७] आयआयटी रुरकी ८] दिल्ली विद्यापीठ ९] आयआयटी गुवाहटी 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.