रविवार, ४ मार्च, २०१८

ईशान्य भारतातही भाजपचा विजय - ४ मार्च २०१८

ईशान्य भारतातही भाजपचा विजय - ४ मार्च २०१८

* वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे सत्ताधाऱ्याविरोधात जाणारा अँटी इन्कम्बसी च्या घटकाची साथ, स्थानिक गटाना साथीला घेत केलेले आवाहन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळापर्यंत पोचलेल्या नेटवर्कच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारली.

* पाच वर्षापूर्वी या भागात भाजपची काहीही शक्ती नव्हती आणि आता ईशान्य भारतातील आणखी दोन राज्यामध्ये कमळ फुलणार असे दिसते आहे.

* ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. आता त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आली आहे.

* नागालँडमध्येही भाजपला सत्ता आली आहे. येथे भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. या निवडणुकीपूर्वी देशातील २९ पैकी १९ राज्यामध्ये भाजपची सत्ता होती.

* त्रिपुरामध्ये एकूण ६० जागांपैकी भाजपला ४३ जागा मिळाल्या.  सीपीएम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सीपीएम १६ जागा मिळाल्या आहेत.

* नागालँड मध्ये एकूण ६० जागा असून त्यापैकी भाजप २९ जागा, एनपीएफ नागा पीपल्स फ्रंट २९ जागा मिळाल्या अन्य २ जागा.

* मेघालायमध्ये एकूण ५९ जागा असून काँग्रेसला २१ जागा, एनपीपी नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा, अन्य १७ जागा, भाजपला २ जागा मिळाल्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.