गुरुवार, १५ मार्च, २०१८

राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड - १५ मार्च २०१८

राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड - १५ मार्च २०१८

* पुरुषापाठोपाठ ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून राणी रामपाल कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

* गोलरक्षक सविता पुनिया संघाची उपकर्णधार असेल. २७ वर्षीय सविताला नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण कोरिया विरुद्धच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

* हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी सविता पुनियाच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले. कोरियाविरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकल्यामुळे भारतीय संघ यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात तगड्या संघाना पराभूत करून खळबळ माजवेल.

* भारतीय महिला हॉकी संघ - राणी रामपाल [कर्णधार], सविता पुनिया [उपकर्णधार], रजनी एटीमपू, दीपिका, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस एक्का, गुजतीत कौर, सुशीला चानू, मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलीमा मिंझ, वंदना कटारिया, लालरेमसीआमी, नवज्योत कौर, नव नीत कौर, पूनम राणी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.