मंगळवार, २० मार्च, २०१८

नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा - १७ मार्च २०१८

नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा - १७ मार्च २०१८

* विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या प्लेऑमध्ये नेपाळने पापुआ न्यू गिनी संघाला ६ विकेट राखून हरवले. त्यामुळे नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे.

* दीपेंद्र सिंग एरिच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या पराभवामुळे गिनीने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला.

* संदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पापुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकात ११४ धावत गुंडाळला.

* त्यानंतर नेपाळने चार फलंदाजाच्या मोबदल्यात २३ षटकात विजयी लक्ष्य पार केले. दिपेंद्रने ५८ चेंडूत एक चौकार आणि तीन षट्कारासह नाबाद ५० धावा काढल्या.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.