शनिवार, २४ मार्च, २०१८

ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एलावेनीलला सुवर्णपदक - २४ मार्च २०१८

ज्युनियर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एलावेनीलला सुवर्णपदक - २४ मार्च २०१८

* यंदाच्या हंगामातील पहिल्याच ज्युनियर  आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या [ISSF] विश्वचषक स्पर्धेत भारताची नेमबाज एलावेनील वलारिवनने १० मीटर्स महिलांच्या एअर रायफल गटात नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला.

* याबरोबरच श्रेया अग्रवाल आणि झीना खीटासह एलावेनीलने सांघिक गटातही सुवर्णपदक मिळवून देताना भारताचा तिरंगा फडकावला.

* १० मीटर्स एअर रायफल गटात भारताचेच वर्चस्व राहिले. पुरुषांच्या गटात अर्जुन बाबूताने कांस्यपदक मिळवले.

* गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघाच्या विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतही एलावेनीलने कांस्यपदक पटकावले होते.

* भारताच्या श्रेया अगरवाल आणि झिना झीटाला ६ वा आणि ७ वा क्रमांक मिळाल्यामुळे भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.