शनिवार, ३१ मार्च, २०१८

५. दशांश अपूर्णांक

५. दशांश अपूर्णांक

* ज्या अपूर्णांकाचा छेद हा १० किंवा १० च्या घातांकात असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात. 
उदा - ८/१०=०.८, ३/१००=०.०३, १५/१०००=०.०१५ 

* व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना.
उदा - प्रथम छेद १० किंवा १० च्या घातांकात करा.४/१०=०.४, छेदाच्या १ वर जेवढे शून्य असतील, तेवढ्या स्थळानंतर अंशाच्या संख्येत डावीकडे दशांश चिन्ह द्या. उदा - १२५/१००० = ०.१२५.

* दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना - गुणकांतील एकूण स्थळे मोजून तेवढ्या स्थळे मोजून तेवढ्या स्थळानंतर गुणाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.
उदा - १५×७=१०५,    ०.१५×०.७=०.१०५

* दशांश अपूर्णांकाचा भागाकार करताना -
१] भाजकाची जेवढी स्थळे भाज्यांपेक्षा जास्त, भागाकार तेवढे शून्य उजवीकडे देणे. उदा - ३६/४=९,  ३.६/०.०४=९०, ०.३६/०.०००४ - ९००

२] भाज्यांची जेवढी दशांश स्थळे भाजपाच्या दशांश स्थळांपेक्षा जास्त तेवढ्या स्थळानंतर भागाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे. उदा - ७५/५ =७५, ०.७५/०.५=१.५ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.