गुरुवार, २९ मार्च, २०१८

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर - २९ मार्च २०१८

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर - २९ मार्च २०१८

* मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पुरेसा पाऊस पडल्यामुळे देशाच्या साखरेच्या उत्पादनात चक्क ४५% वाढ दिसत असून, देशातील साखरेचे उत्पादन सुमारे २९५ लाख टनापर्यंत जाईल

* यावर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशालाही मागे टाकून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर राज्यात सोलापूर जिल्ह्याचे साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे

* एकट्या सोलापूर जिल्ह्यात १७ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील ५२३ साखर कारखान्यापैकी सर्वात जास्त १८७ साखर कारखाने महाराष्ट्रात चालू होते

* अद्यापही महाराष्ट्रातील १५० साखर कारखाने चालू आहेत. मुबलक उत्पादन झाले तर साखरेचे काय करायचे ही चिंता सरकारबरोबर साखर उत्पादकांनाही पडणे साहजिकच आहे. 

* साखर कारखानदारी ही प्रचंड रोजगार निर्मिती करणारी इंडस्ट्री आहे. सध्या महाराष्ट्रात २०० च्यवर साखर कारखाने आहेत. यंदा मात्र १८७ कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.