शुक्रवार, ३० मार्च, २०१८

टाइम्सच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत पंतप्रधान मोदी - ३० मार्च २०१८

टाइम्सच्या प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत पंतप्रधान मोदी - ३० मार्च २०१८

* प्रसिद्ध टाइम मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत सलग चौथ्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आले आहे.

* या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती ब्लाडिनीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांचाही समावेश आहे.

* गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून टाइम कडून जगभरातील प्रभावशाली व्यक्तीची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नेते, कलाकार, शास्त्रज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, उद्योगपती, धर्मगुरू यांना स्थान देण्यात येते.

* यंदाच्या वर्षातील अंतिम विजेत्यांची यादी पुढील महिन्यात जाहीर होईल. तत्पूर्वी टाइम च्या संपादकांनी जगभरातील १०० जणांचा समावेश असलेली एक प्राथमिक यादी गुरुवारी जाहीर केली.

* यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीनाही स्थान देण्यात आले आहे. २०१५ सालापासूच्या प्रत्येक यादीत मोदींच्या नावाचा समावेश आहे. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.

* ऑनलाईन मतदान करून जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तीची निवड करायची आहे. मोदींशिवाय या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची कन्या एवांका ट्रम्प, त्यांची कन्या एवांका ट्रम्प, जावई जेरेड कुशनर.

* रशियाचे राष्ट्रपती ब्लाडिनीर पुतीन चीनचे शी जिनपिंग, मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ नडेला, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोफ, पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन अभिनेता कूमैल नानजीआनी, प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट, प्रिन्स हॅरी आणि त्याची होणारी पत्नी मेघन, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.