शनिवार, १० मार्च, २०१८

इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी - १० मार्च २०१८

इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी - १० मार्च २०१८

* मृत्यूने सन्मानाने स्वीकार कारण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे. असे मत व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाला परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल शुक्रवारी दिला.

* सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या ए के सिक्री, न्या अजय खानविलकर, न्या धनंजय चंद्रवूड, न्या अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. इच्छामरणासाठी 'कॉमन कॉज' या संस्थेने याचिका केली होती.

* आपण भविष्यात कोमामध्ये गेलो वा कधीच बरे होऊ शकणार नाही. अशी स्थिती ओढवली. तर लाईफ सपोर्ट यंत्रणेवर आपल्याला ठेवू नये, असे इच्छामृत्युपत्र करून ठेवण्याचा व्यक्तीला म्हटले आहे.

* इच्छामरणासाठी न्यायालयाने कडक अटीही घातल्या आहेत. मरणासन्न रुग्ण वाचण्याची शक्यता आहे की नाही याची तपासणी वैद्यकीय तज्ञाकडून केली जावी. त्यांच्या अहवालानंतर रुग्णाला इच्छामरण द्यायचे की नाही हे ठरविण्यात यावे असे न्यायालयाने स्पष्ट केले.

* मालमत्तेवरून वाद सुरु असताना मुद्दा अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. व्यक्तीने इच्छापत्र केले नसल्यास व तो मरणासन्न अवस्थेत असल्यास त्यांच्या इच्छामरणाची नातेवाईक उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

* एका निकालात खंडपीठातील ५ पैकी चार न्यायाधीशांची इच्छामरणाबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. मात्र इच्छामृत्यूपत्र करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. या गोष्टीवर सर्वांचे एकमत झाले.

* राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ नुसार व्यक्तींना जगण्याप्रमाणेच इच्छामरणाचाही अधिकार देण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.