बुधवार, ७ मार्च, २०१८

जगभरात बालविवाहाच्या संख्येत झपाट्याने घट - ७ मार्च २०१८

जगभरात बालविवाहाच्या संख्येत झपाट्याने घट - ७ मार्च २०१८

* जगभरात बालविवाहाच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

* २.५ कोटी बालविवाहावर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशामध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे. 

* भारतात किशोरवयीन लोकसंख्येपैकी २० टक्क्याहून अधिक किशोरवयीन भारतात आहेत. त्यातही दक्षिण आशियामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे युनिसेफच्या बालसंरक्षण विभागाचे प्रमुख जावीयर एग्लीवार यांनी सांगितले आहे. 

* मागील दशकात १८ वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलीचे प्रमाण भारतात जवळपास ४७% होते. हे प्रमाण आता कमी झाले असून २७ टक्क्यापर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

* बालविवाहामुळे महिलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान या सगळ्यावर गदा येत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. 

* भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत. भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलांच्या किंवा मुलींच्या पालकांना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षाचा कारावास भोगावा लागू शकतो. 

* मात्र भारतीय समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात रूढ झालेला असल्याने कायद्याचा विचार न करता सर्रास बालविवाह लावले जातात. परंतु याचे प्रमाण मागील काही काळात कमी झाले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.