सोमवार, १२ मार्च, २०१८

जर्मनीच्या चॅन्सलरपदी चौथ्यांदा अँजेला मर्केल - १२ मार्च २०१८

जर्मनीच्या चॅन्सलरपदी चौथ्यांदा अँजेला मर्केल - १२ मार्च २०१८

* जर्मनीतील सत्ताधारी ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियन पक्षाला प्रमुख विरोधी पक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टीने [एसडीपी] आज अखेर पाठिंबा दिल्याने अँजेला मर्केल यांचे चॅन्सलर निर्धोक झाले आहे.

* मर्केल यांचा चॅन्सलरपदाचा हा चौथा कार्यकाळ आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत [एसडीपी] आणि सीडीयु एकमेकांविरोधात लढले होते. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करत या दोन्ही पक्षाचा महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला.

* जर्मनी हा युरोपातील सर्वात बलाढ्य देश असल्याने आणि युरोपीय महासंघात जर्मनीला, पर्यायाने मर्केल यांना मोठे महत्व असल्याने या निर्णयाचे युरोपातून स्वागत होत आहे.

* सद्यस्थितीत जर्मनीमध्ये मर्केल यांच्या तोडीचा दुसरा नेता नसल्याने जर्मनीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी 'एसडीपी'ने पाठिंबा दिला आहे.

* मर्केल यांचे राजकीय गुरु हेल्मेट कोल यांनी सर्वाधिक काळ चॅन्सलरपदाचा चौथा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मर्केल या विक्रमाची बरोबरी करतील.

* युरोपमध्ये सध्या स्थलांतराचा प्रश्न, हिंसाचार, आर्थिक अस्वस्थता असे प्रश्न भेडसावत असल्याने मर्केल यांना पुन्हा सत्ता मिळाल्याने नव्याने अशा निर्माण झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.