सोमवार, २६ मार्च, २०१८

विशेष लेख - भविष्यातील लायफाय तंत्रज्ञान - २७ मार्च २०१८

विशेष लेख - भविष्यातील लायफाय तंत्रज्ञान - २७ मार्च २०१८

* बटन दाबताच तीन तासांचा चित्रपट एका क्षणात डाउनलोड हो आता हे लवकरच शक्य होणार आहे. वायफाय चा इंटरनेट वेग हा तुम्हाला वेगवान वाटत असेल तर थांबा. 

* थोड्या दिवसात वायफाय हे तंत्रज्ञान येत असून याद्वारे अवघ्या एका सेकंदात १ जीबी डेटा डाउनलोड करता येणार आहे.

* जीवनात इंटरनेटचा वापर वाढला आहे. साहजिकच तो जितका जास्त वेगवान तितका वापरकर्त्यांला आनंद वाटतो. ऑनलाईन व्हिडीओ पाहायचा असो वा एखादा व्हिडीओ डाउनलोड करायचा असो.

* सध्या वापरकर्त्यांना झटपट गोष्टी पाहिजे असतात. सध्या बाजारात अगदी १०० एमबीपीएस या वेगाची इंटरनेट सुविधा पुरविण्यात येत आहे. याखेरीज वायफायच्या माध्यमातून ब्रॉडबँड इंटरनेटचा कमालीचा वेग उपलब्द झाला आहे.

* मात्र वायफाय पेक्षाही अधिक वेगवान लायफाय अर्थात [लिक्विड फिडॅलिटी] हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षाही १००% जास्त आहे. 

* स्लो डाऊनमुळे तमाम नेटिझन्स त्रस्त असतात. त्यावर पर्याय म्हणून वायफाय विकसित झाले आहे. [वायफाय] हे रेडिओ लहरीवर आधारित असते. 

* या लहरींच्या माध्यमातून इंटरनेटचे चलनवलन होत असते. मात्र लायफाय मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट चलनवलन होत असते. 

* मात्र लायफाय मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. २०११ मध्ये स्कॉटलँडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेराल्ड हास यांनी लायफायच संशोधन केलं आहे. 

* वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो. हे त्यांना आढळून आले आणि त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. 

* आता हे तंत्रज्ञान अनेक देशात रुजू लागले आहे. लायफाय या तंत्रज्ञानाचा शोध २०११ पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या लायफाय तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला १० गिगाबाईट्स इतका आहे. 

* वायफायच्या तुलनेत शंभरपट वेगवान असलेल्या लायफाय तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लड युके या देशामध्ये केला जात आहे. 

* मेक इन इंडिया ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. लायफाय च्या माध्यमातून माणसांच्या डोळ्यानाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकता येते. 

* वायफायच्या तुलनेत लायफायचा आणखी एक फायदा असा की यात संदेश हॅक करता येणार नाही. कारण प्रकाश हेच माहिती वहनाचे साधन असल्याने प्रकाश चोरणे हॅकर्सलाही शक्य नाही. 

* कॉम्पुटर, मोबाईल तसेच इंटरनेट कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गॅझेटला हे तंत्रज्ञान साहाय्यभूत ठरणार आहे. लायफाय या तंत्रज्ञान एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरविण्यात येते. 

* या बल्बमध्ये एक मायक्रोचीप बसवण्यात येते. व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन [VLC] अर्थात [दृश्य प्रकाश वहन] च्या माध्यमातून ते काम करते. महत्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समीट होणार तंत्रज्ञान आहे. 

* लायफायमुळे वायफाय नेटवर्कसंदर्भात जाणवणाऱ्या सुरक्षेच्या काही समस्या सुटू शकतात. उदा काही ठिकाणी अपरिहार्य कारणास्तव रेडिओ लहरींना मज्जाव असतो. अशा ठिकाणी प्रकाशाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण शक्य आहे. 

* शिवाय रेडिओ लहरी या भिंतीतून आरपार जाऊ शकतात. पण प्रकाशाच्या लहरी या भिंतीला भेदू शकत नाहीत. तेव्हा वायफायप्रमाणे लायफाय ची रेंज भिंत ओलांडून पुढे न जाता भिंतीत हॅकर्सपासून सुरक्षित राहते. 

* मोठी कार्यालये, रुग्णांसाठी तर हे तंत्र वरदानच ठरेल. येथे इंटरनेट सिग्नलमध्ये बाधा कमी येतील. हे तंत्रज्ञान फारसे खर्चिक नसल्याने संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.