मंगळवार, २० मार्च, २०१८

स्टाफ, रेल्वे, बँक परीक्षासाठी एकच सीईटी परीक्षा - २० मार्च २०१८

स्टाफ, रेल्वे, बँक परीक्षासाठी एकच सीईटी परीक्षा - २० मार्च २०१८

* बँका, रेल्वे, स्टाफ, सिलेक्शन कमिशन, केंद्राच्या अखत्यारीस कार्यालयामध्ये गट 'ब' राजपत्रित आणि त्याखालील पदे भरण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकत्रच पूर्वपरीक्षा [सीईटी] होणार आहे.

* मुख्य परीक्षा मात्र स्वतंत्रपणे त्या त्या संस्थांनी घ्यायच्या आहेत. यात मिळालेला स्कोअर २ वर्षासाठी पात्र असेल. म्हणजे एकदा सीईटी दिल्यानंतर नंतरच्या २ वर्षात निघणाऱ्या जागांमध्ये विद्यार्थ्याला निवडीची संधी मिळेल.

* याची सुरुवात २०१९ पासून होणार आहे. केंद्राच्या अंदाजानुसार, सध्या जवळपास ५ कोटी विद्यार्थी या परीक्षा वर्षभर देतात. त्यामुळे केंद्रीय नियोजनाने हा निर्णय घेतला आहे.

* सीईटी किंवा परीक्षेचे स्वरूप - दोन टप्प्यात परीक्षा, [टियर १ मध्ये एसएससी, रेल्वे, बँक, - पूर्वपरीक्षा],सीईटी साठी पेपरचे ३ स्तर असतील, ही परीक्षा स्वतंत्रपणे होणार, एसएससी-बँकांसाठी-आयबीपीएस परीक्षा, रेल्वेसाठी रेल्वे भरती बोर्ड आवश्यकतेनुसार परीक्षा, सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांचा विचार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.