गुरुवार, ८ मार्च, २०१८

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल २०१७-१८ - ८ मार्च २०१८

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल २०१७-१८ - ८ मार्च २०१८

* महाराष्ट्राच्या कृषिक्षेत्राची वाढ २०१७-१८ मध्ये गेलेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच घसरली असून अर्थव्यवस्थेची वाढही मंदावली असल्याचा अंदाज आर्थिक पाहणीमध्ये वर्तविण्यात आला. 

* राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या बजेट सादर करणार आहेत. गुरुवारी आर्थिक पाहणी सादर करण्यात आली असून राज्याची अर्थव्यवस्था रुळावर नसल्याचे दिसून आले आहे. 

* आर्थिक पाहणीच्या अंदाजानुसार २०१७-२०१८ वर्षांमध्ये कृषी क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या १२.५ टक्क्याच्या तुलनेत घसरून ८.३% झाली आहे. तर  २०१६-१७ राज्याची अर्थव्यवस्था १० टक्क्याच्या गतीने वाढली होती. 

* मात्र यंदाच्या वर्षी ती अवघ्या ७.३ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कृषी क्षेत्राच्या पीछेहाटीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडल्याचे दिसत आहे. 

* वार्षिक दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर ते २०१६-१७ च्या एक लाख ६५ हजार ४९१ रुपयांच्या तुलनेत किंचित वाढून एक लाख ८० हजार ५९६ रुपये झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

* महाराष्ट्र सरकारच्या इंडस्ट्रियल अँड पॉलिसी प्रमोशन खात्याच्या अहवालानुसार एप्रिल २००० ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत भारतात आलेल्या एकूण एफडीआयच्या ही ३१% आहे. 

* विशेष म्हणजे तुरीचे व कापसाचे उत्पादन यावर्षी चांगलेच घसरल्याचे आर्थिक पाहणीत आढळले आहे. २०१६-१७ मध्ये राज्यात तुरीचे उत्पादन २० लाख ताणापेक्षा जास्त झाले होते. 

* जे तब्बल ५३ टक्क्यांनी घसरून २०१७-१८ यावर्षात १० लाख टनापेक्षा कमी झाले आहे. तर कापसाचे उत्पादनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ४४ टक्क्यांनी घसरल्याचा अंदाज आहे. 

* कर्जमाफी योजनेसाठी राज्यातील ४७ लाख शेतकरी पात्र ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. उसाचे उत्पादन हा एकमेव आशेचा किरण या आर्थिक पाहणीत आढळला आहे. 

* उसाचे उत्पादन २०१७-१८ मध्ये आधीच्या वर्षाच्या ५४ लाख टनांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढून ६७ लाख टन झाल्याचा अंदाज पाहणीमध्ये नमूद करण्यात आला आहे. 

* जनधन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात २ कोटी खाती उघडण्यात आल्याचे तसेच मुद्रा योजने अंतर्गत ४४,५८३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.