मंगळवार, ६ मार्च, २०१८

भारताकडे जगात चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य - ६ मार्च २०१८

भारताकडे जगात चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य - ६ मार्च २०१८

* भारतीय सैन्याचे जगभरात कौतुक होत असल्याने आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे आता जगभरात अधिकृतपणे निश्चित झाले आहे. 'ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स' ने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणावरून नुकतीच एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

* त्यानुसार १३३ देशामध्ये भारताचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

* यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

* विशेष म्हणजे भारताचा शत्रू आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानचा या यादीत १३ वा क्रमांक आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५ मध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्थान कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.

* फ्रान्स, युके, जपान, तुर्की, आणि जर्मनी हे देशही पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. या सर्वेक्षणासाठी सैन्याशी निगडित विविध ५० निकषाचा अभ्यास करण्यात आला होता.

* यात भौगोलिक स्थिती लष्कराकडे असणारे स्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला आहे.

* जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार भारताकडे ४२,७, २४० सशस्त्र सैनिक असून त्यातील १३,६२,५०० इतके सक्रिय आहेत. तर चीनकडे ३७,१२,५०० सशस्त्र सैन्य सक्रिय आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.