गुरुवार, १५ मार्च, २०१८

देशात पुण्याचे प्रशासन सर्वोत्तम - १५ मार्च २०१८

देशात पुण्याचे प्रशासन सर्वोत्तम - १५ मार्च २०१८

* स्थानिक प्रशासन बाबतीत हे देशातील सर्वोत्तम शहर ठरले असून, या बाबतीत बंगळुरू देशात शेवटच्या क्रमांकावर असल्याचे एका एनजीओने केलेल्या ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. 

* या अहवालात राजधानी दिल्लीचा प्रशासन व्यवस्थेच्या बाबतीत देशात ६ वा तर मुंबईचा ९ वा क्रमांक आला आहे. 

* जनग्रह सेंटर फॉर सिटीझनशिप डेमोक्रेसी या एनजीओने विविध निकषाच्या आधारे देशाच्या २० राज्यातील २३ शहरांच्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास करून अन्युअल सर्व्ह ऑफ इंडिया सिटी-सिस्टीमच्या [एएसआय सीएस] या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. 

* या अहवालात शहरांच्या प्रशासन व्यवस्थेच्या ४.२ गुण देण्यात देण्यात आले आहेत. यादीत बंगळुरू सर्वात शेवटी आहे. बंगळुरूला प्रशासन व्यवस्थेसाठी केवळ ३ गुण मिळाले आहेत.

* उत्तम प्रशासन असणाऱ्या शहरांची यादी अनुक्रमे - पुणे ५.१, कोलकाता ४.६, तुरुअनंतपुरम ४.६, भुवनेश्वर ४.६, सुरत ४.५ गुण, दिल्ली ४.४ गुण, अहमदाबाद ४.४ गुण, हैद्राबाद ४.३गुण, मुंबई ४.२ गुण, रांची ४.१ गुण, रायपूर ४.० गुण, कानपुर ३.९ गुण, लखनौ ३.८ गुण, गुवाहाटी ३.८ गुण, भोपाळ ३.७ गुण, लुधियाना ३.५ गुण, विशाखापट्टणम ३.४ गुण, जयपूर ३.४ गुण, चेन्नई ३.३ गुण, पाटणा ३.३ गुण, डेहराडून ३.१ गुण, चंदीगड ३.१, बंगळुरू ३.० गुण.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.