शनिवार, ३ मार्च, २०१८

आर्थिक अपराध विधेयक २०१८ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - ३ मार्च २०१८

आर्थिक अपराध विधेयक २०१८ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - ३ मार्च २०१८

*  कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांना निपटण्यासाठी व परदेशात पळून जाणाऱ्या घोटाळ्यातील आरोपीविरोधात कारवाई करता यावी, यासाठी अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने पळून जाणाऱ्या विरोधात आर्थिक अपराध विधेयक २०१८ ला मंजुरी दिली आहे.

* या विधेयकाच्या मदतीमुळे गुन्हा करून परदेशात पळून जाणाऱ्याना न्यायालयात दोषी ठरविल्याविना त्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे.

* हे विधेयक ५ मार्चला सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सादर करता येईल. देशात लूट करून पळून जाणे व कायद्याला धाब्यावर बसवण्याची कोणालाही परवानगी देता येणार नाही.

* या विधेयकामध्ये जे परदेशात अशा प्रकारे पळून गेले आहेत. व भारतात परतण्यास नकार देत आहेत. त्यांच्याविरोधात योग्य त्या कारवाईची तरतूद केली आहे.

* या तरतुदीनुसार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वा बँक कर्ज परत न करण्यासंबंधात वा जाणीवपूर्वक कर्ज परत न करणाऱ्यांविरोधात तसेच ज्यांच्याविरोधात अटक वॉरंट लागू केले असून ते त्यांच्यावर लागू असेल.

* अशा प्रकारे आर्थिक गुन्हा करून पलायन केलेले लोक, ज्यांच्या आर्थिक गुन्ह्यामध्ये दोषी ठरवले जाण्यापूर्वीही त्यांची मालमत्ता आधीच जप्त करता येऊ शकेल त्यातून ती मालमत्ता विकून बँक कर्ज चुकवले जाईल.

* या प्रकारचे आर्थिक गुन्हे आहेत, त्यांच्यावरील सुनावणी ही मनिलॉन्डरिंग कायद्याअंतर्गत केली जाईल. या आर्थिक गुन्हेगारांची परदेशातील मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद यात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.