मंगळवार, १३ मार्च, २०१८

काही विषेश चालू घडामोडी - १६ मार्च २०१८

काही विषेश चालू घडामोडी - १६ मार्च २०१८

* राष्ट्रीय वित्तीय सूचना प्राधिकरण [National Financial Reporting Authority-NFRA] याची स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी एक अध्यक्ष, तीन पूर्णकालीन सदस्य आणि एक सचिव याप्रमाणे पदाच्या निर्मितीसाठी सुद्धा मंजूरी दिली आहे.

* २०२० मध्ये टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलंपिक आणि पॅराऑलंपिकसाठी 'शुभंकर' जाहीर करण्यात आले. जपानमध्ये सुपरहिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॉमिक पात्रांची खेळांचे शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे.

* जगातील पहिले आण्विक उर्जेवरील विमान आण्विक उर्जेवर चालणारे हे जगातील पहिले मॅग्नावेम विमान आहे. या विमानाचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी याची कन्सेप्ट डिझाईन तयार केली आहे. या विमानाची किमान गती सुमारे १८५० किमी प्रतितास राहील.

* २८ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतीय लष्कराचे 'नाग' या रणगाडा भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचे [ATMG] यशस्वीरित्या चाचणी घेतली.

* एका मैलाच्या धावण्याच्या शर्यत चार मिनिटाच्या आत पूर्ण करून विश्व विक्रमाला सर्वप्रथम गवसणी घालणारे ब्रिटनचे महान धावपटू रॉजर बॅनीस्टर यांचे १० मार्च रोजी निधन झाले.

* केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे हवाई वाहतूक मंत्रालयाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

* १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा कायदा राजस्थान विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. मध्यप्रदेशनंतर असा कायदा करणारे राजस्थान हे दुसरे राज्य आहे. '

* साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.

* मलेशियात खेळल्या जाणाऱ्या २०१८ सुल्तान अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद जिंकले आहे.

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मॉरिशस पोर्ट लुईस शहरात भारताच्या मदतीने उभारलेल्या 'जागतिक हिंदी सचिवालय' याचे उदघाटन करण्यात आले आहे.

 * सितांशू कार यांची पत्र माहिती कार्यालय [PIB] चे पुढील प्रमुख म्हणून नेमणूक केली गेली आहे. सीतांशू कार सध्या आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभाग [NSD] चे महासंचालक आहेत.

* पत्र माहिती कार्यालय [Press Information Bureau - PIB] ही एक भारत सरकारची एक केंद्रीय वृत्त संस्था आहे. याची स्थापना १९९१ साली करण्यात आली आहे.

* नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विदया देवी भंडारी यांची राष्ट्रपती पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्या २०१५ साली नेपाळच्या प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.

* नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळ हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. काठमांडू ही या देशाची राजधानी आहे आणि नेपाळी रुपया हे चलन आहे.

* ७-९ मार्च २०१८ रोजी मेक्सिकोमध्ये जागतिक महासागर शिखर परिषद २०१८ यशस्वीपणे पार पडली. ही परिषद २०१२ सालापासून जागतिक महासागर शिखर परिषदेचे आयोजन [द इकॉनॉमिस्ट इव्हेन्ट] संस्थेतर्फे करण्यात आले.

* विनोदांची रसिकांना खळखळून हसविणारे [हसरी उठाठेव] फेम ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत १३ मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

* केंद्र शासनाकडून महानदी जलविवादाला सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेत एकूण तीन सदस्यांचे तंटा न्यायाधिकरण गठीत करण्यात आले.

* भारताची किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी गुजरातमध्ये [नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग - NACP] उभारले जाणार आहे.

* धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रीडा मैदानावर खेळण्यात आलेला [देवधर करंडक २०१८' इंडिया B - ने जिंकला आहे.

* देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज किल्ला तलावाजवळ १२ मार्च रोजी फडकविण्यात आला. ध्वजाची उंची ११० मीटर असून, देशातील हा सर्वात उंच ध्वज ठरला आहे.

* उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन व लोकार्पण मा नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केले.

* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा [मनरेगा] अंतर्गत रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यामध्ये पश्चिम बबंगाल अग्रेसर ठरला.

* भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ३२४ तेजस लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. वायुदलाच्या ताफ्यात आतापर्यंत १२३ तेजस लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.