शुक्रवार, ९ मार्च, २०१८

बिप्लव कुमार देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री - ९ मार्च २०१८

बिप्लव कुमार देव त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री - ९ मार्च २०१८

* त्रिपुराचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष बिप्लव कुमार देव हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपशासित सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

* तब्बल २५ वर्षानंतर डाव्यांची सत्ता बदलली आहे. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

* ४८ वर्षीय बिप्लव देव यांनी आपली कारकीर्द दिल्लीतून सुरु केली होती. सर्वात आधी ते संघाचे स्वयंसेवक होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

* दक्षिण त्रिपुरातील उदयपूरमध्ये बिप्लव देव यांचा जन्म, १९९८ मध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर ते दिल्लीत गेले.

* १९९८ ते २०१५ पर्यंत ते दिल्लीतच राहिले. २०१५ साली बिप्लव देव यांच्यावर त्रिपुराची जबाबदारी सोपविण्यात आली.  जानेवारी २०१६ साली त्यांची त्रिपुराच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.