मंगळवार, २७ मार्च, २०१८

ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत अनीश भानवलचा नेमबाजीत सुवर्णपदक - २७ मार्च २०१८

ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत अनीश भानवलचा नेमबाजीत सुवर्णपदक - २७ मार्च २०१८

* उदयोन्मुख नेमबाज अनीश भानवलने सोमवारी आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकपमध्ये २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताचे वैयक्तिक स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक आहे.

* १५ वर्षीय या खेळाडूने सर्वोच्च स्कोअरसह फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अंतिम फेरीत त्याला भारताच्या अनहज जायांदा व राजकुमार सिंग बंधू यांच्याव्यतिरिक्त चीनच्या तीन नेमबाजांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

* अनिशच्या सुवर्णपदक भारतीय संघानी एकूण १५ पदकासह तालिकेत चीननंतर दुसरे स्थान गाठले. भारताच्या खात्यावर ६ सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकाची नोंद आहे.

* चीनने विक्रमी १७३३ अंकासह २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकाची नोंद आहे.

* चीनने विक्रमी १७३३ अंकासह २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदकाचा मान मिळविला. अनीश भानवला, जायांदा व आदर्श सिंग यांच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

* विशेष म्हणजे सांघिक कांस्यपदकही भारतीय खेळाडूंनी पटकावले. त्यात संधूसोबत जपत्येश सिंग जसपाल व मनदीप यांचा समावेश होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.