मंगळवार, १३ मार्च, २०१८

नेपाळमध्ये विमान कोसळून ५० जण ठार - १३ मार्च २०१८

नेपाळमध्ये विमान कोसळून ५० जण ठार - १३ मार्च २०१८

* अमेरिकी-बांगलादेशी विमान कंपनीच्या विमानाला नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातात सुमारे ५० पेक्षा अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले.

* विमान धावपट्टीवर उतरताना त्याला अपघात झाला आणि त्यानंतर ते विमानतळाच्या शेजारी असलेल्या फुटबॉलच्या मैदानावर जाऊन कोसळले. या वेळी विमानाला मोठी आग लावली.

* काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या [टीआयए] प्रवक्त्याने सांगितले की, चार कर्मचारी आणि ६७ प्रवासी करत असलेल्या 'बंबार्डियर ८ क्यू ४००' प्रकारच्या विमानाला धावपट्टीवर उतरत असताना अपघात झाला.

* काही तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.