गुरुवार, ८ मार्च, २०१८

अमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती - ८ मार्च २०१८

अमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती - ८ मार्च २०१८

* अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्झने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून ११० अब्ज डॉलरची संपत्ती असलेले जेफ बेझोस पहिल्या स्थानावर आहेत.

* तर या यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर आहे. तर तिसऱ्या स्थानावर गुंतवणूक गुरु अशी ओळख असलेले वॉरन बफेट ८४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

* बर्नाल्ड अरनॉल्ड चौथ्या ७२ अब्ज डॉलर्स व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती ७१ अब्ज डॉलर्स आहे.

* गेल्या वर्षी अंबानी २० व्या स्थानावर होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचे ४०.१ अब्ज डॉलर्सची आहे. गेल्या वर्षी अंबानी २० व्या स्थानावर होते.

* फोर्ब्झच्या यादीत खालील अनेक भारतीय उद्योगपती असून त्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत.
* हिंदुजा कुटुंबीय - १९.५ अब्ज डॉलर्स
* अझीम प्रेमजी - १८.८ अब्ज डॉलर्स
* लक्ष्मी मित्तल - १८.५ अब्ज डॉलर्स
* शिव नाडर - १४.६ अब्ज डॉलर्स
* दिलीप संघवी - १२.८ अब्ज डॉलर्स
* कुमार बिर्ला - ११.८ अब्ज डॉलर्स
* उदय कोटक - १०.७ अब्ज डॉलर्स
* राधाकृष्ण धामणी - १० अब्ज डॉलर्स
* सायरस पुनावाला - ९.१ अब्ज डॉलर्स
* सावित्री जिंदाल व कुटुंब - ८.८ अब्ज डॉलर्स
* सुनील मित्तल व कुटुंब - ८.८ अब्ज डॉलर्स
* पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण - ६.३ अब्ज डॉलर्स
* विक्रम पाल - ६.३ अब्ज डॉलर्स
* नुसली वाडिया - ६.२ अब्ज डॉलर्स
* बेणू गोपाळ बांगर - ६ अब्ज डॉलर्स
* विवेक चंद सेहगल - ६ अब्ज डॉलर्स
* कलानिधी मारन - ५.२ अब्ज डॉलर्स
* सुभाष चंद्रा - ५ अब्ज डॉलर्स

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.