बुधवार, २८ मार्च, २०१८

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉर्नर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी - २८ मार्च २०१८

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉर्नर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी - २८ मार्च २०१८

* बॉल टॅम्परिंगप्रकरणी दोषी आढळलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तब्बल एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.

* तसेच बॅनक्रॅफ्टवर ९ महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज बुधवार याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे आयपीएलमध्येही खेळणार नसल्याच समजत आहे.

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरून बँकक्राफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरून रंगेहाथ पकडलं होत.

* बँकक्राफ्टच चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरून तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलिया दिल्यानंतर कर्णधार आपल्या पदावरून पायउतार झाला.

* आयसीसीने स्मिथवर सामना मानधनाच्या १००% दंड ठोठावला आहे. आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बँकक्राफ्ट ७५% दंड ठोठावला असून तीन डिमेरिट्झ पॉईंट देण्यात आले आहेत.

* बॉल टेम्परिंग म्हणजे काय - या क्रिकेटिंग टर्मचा मराठीत चेंडू अवैधरित्या हाताळणं असा सोपा अनुवाद आपल्याला करता येईल. पण चेंडू अवैधरित्या हाताळणं यात अनेक गैरप्रकारांचा समावेश होतो.

* माती, बाटलीच्या झाकणाने किंवा कोणत्याही वस्तून चेंडू जाणीवपूर्वक घासणं चेंडूची शिवण दातांनी किंवा नखांनी उसवण, चेंडूवर दातांनी किंवा नखांनी ओरखडणे पाडणं.

* मिंट किंवा चिंगम चघळून तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेन किंवा व्हॅसेलीनसारखे पदार्थ लावून एका बाजूची लकाकी राखण या साऱ्या बाबी बॉल टेम्परिंगमध्ये मोडतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.