मंगळवार, २७ मार्च, २०१८

महाराष्ट्राची कांची अडवाणी मिस इंडिया - २७ मार्च २०१८

महाराष्ट्राची कांची अडवाणी मिस इंडिया - २७ मार्च २०१८

* आधीच ९ वर्षाच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची अडवाणींने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीर सौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला.

* महाराष्ट्राच्या कांची अडवाणीने  ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठव मणिपूरच्या वर्चस्वाच्या धक्का दिला.

* मूळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमूना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

* महिलांच्या स्पोर्ट्स मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रुपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.