शनिवार, ३ मार्च, २०१८

जगातील सर्वात मोठ्या कर्नाटकातील सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन - ४ मार्च २०१८

जगातील सर्वात मोठ्या कर्नाटकातील सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन - ४ मार्च २०१८

* कर्नाटक सरकारने तुमकूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पावागड क्षेत्रातील २,००० मेगावॅट क्षमतेच्या सौर पार्कचा पहिला टप्पा गुरुवारी सुरु करण्यात आला.

* १६,५०० कोटीच्या 'शक्तिस्थळ' नावाच्या पार्कच्या पहिल्या टप्प्यात ६०० मेगावॅटची निर्मिती होईल, तर उर्वरित १,४०० मेगावॅट या वर्षाच्या अखेरीस सुरु होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती सरकारने एका निवेदनात दिली.

* हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प असून तो १३,००० एकर आणि पाच गावामध्ये पसरलेला आहे. हा प्रकल्प कर्नाटक सोलर पॉलिसी २०१४-२०२१ चा भाग आहे.

* या प्रकल्पाचा उद्देश राज्यातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पारंपरिक ऊर्जा स्रोतांवर अवलंबून राहणे आणि पर्यावरणास अनुकूल दृष्टिकोनातून हलविणे आहे.

* हा प्रकल्प म्हणजे २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १०० गिगावॅट तयार करण्याच्या प्रकल्पाची भागीदारी आहे.

* या सोलर पार्कची जमीन सुमारे २३०० शेतकऱ्यांच्या सरकारकडून २५ वर्षाच्या भाडेपट्टीवर घेण्यात आली आहे. त्या बदल्यात त्यांना प्रति एकर २१,००० रुपये वार्षिक भाडे दिले जाते. तर दर २ वर्षांनी ५% वाढ म्हणून मोबदला.

* गेल्या ६० वर्षांपासून ५४ भागात दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या भागातील जनतेच्या स्थलांतर रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली होती.

* कर्नाटक पुनर्नवीकरणीय ऊर्जा विकास लिमीटेड [केआरईडीएल] आणि सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [एसईसीआय] यांच्या संयुक्त उपक्रमात मार्च २०१५ मध्ये स्थापन झालेल्या एक संस्था, कर्नाटक सोलर पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून हा सोलर पार्क उभारण्यात आला आहे. 

* जगातील याआधीचे टॉप ५ सोलर पार्क - टेनेजर डेझर्ट सोलर पार्क १५०० मेगावॅट - चीन, डेटॉन्ग सोलर पार्क १००० मेगावॅट - चीन, कुर्नुल सोलर पार्क ९०० मेगावॅट - आंध्रप्रदेश भारत, लॉन्गएग्झिका डॅम सोलर पार्क ८५० मेगावॅट - चीन, कमुथी सोलर पार्क - ६४८ मेगावॅट - तामिळनाडू भारत.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.