मंगळवार, ६ मार्च, २०१८

ताल चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आनंदला जेतेपद - ६ मार्च २०१८

ताल चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आनंदला जेतेपद - ६ मार्च २०१८

* विश्वरॅपिड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने बुद्धिबळाच्या जलद पटावर शानदार फार्म कायम राखत अंतिम फेरीत इस्त्रायलचा खेळाडू बोरिस गेलफॅड सोपा ड्रॉ खेळल्यानंतर ताल चषक आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळवले.

* भारताच्या विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या स्पर्धेत अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असल्यामुळे आनंदची कामगिरी विशेष मानली जात आहे.

* बोरिस ग्लेफंड, पीटर स्वीडलर, ब्लाडिनिर क्रमणिक व सर्जी कर्यायीन या बलाढ्य खेळाडूंना बरोबरीत रोखले. आनंदने यंदाच्या मोसमात जलद पद्धतीच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत आपण चाळीशीनंतरही अव्वल यश मिळू शकते.

* विश्वनाथन आनंदने दोन महिन्यापूर्वी रियाध येथे विश्वरॅपिड स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. आणि आता हा विश्वविजेता भारतीय खेळाडू बिल्ट्झ टूर्नामेंटला गवसणी घालायला सज्ज झाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.