शुक्रवार, २३ मार्च, २०१८

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव - २३ मार्च २०१८

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव - २३ मार्च २०१८

* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय गुरुवारी सरकारकडून जाहीर करण्यात आला.

* भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ही मागणी मान्य करत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.

* १५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता.

* या विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी याला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.

* या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.