गुरुवार, २९ मार्च, २०१८

भारतीय भाषांमुळे २० कोटी इंटरनेट युजरची संख्या वाढणार - २९ मार्च २०१८

भारतीय भाषांमुळे २० कोटी इंटरनेट युजरची संख्या वाढणार - २९ मार्च २०१८

* इंटरनेटच्या वापराची भाषा इंग्रजी असल्यामुळे त्याच्या विस्ताराला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांना आपल्या पसंतीच्या प्रादेशिक भाषेत इंटरनेट वापराची संधी मिळाली.

* तर एकूण वापरकर्त्यांचे २०.५ कोटींची भर पडेल, असा विश्वास इंटरनेट अँड मोबॉईल असोशिएशन ऑफ इंडियाच्या [IAMMI] अहवालात व्यक्त केला आहे.

* IAMMI च्या [इंटरनेट ऑफ इंडिया] या अहवालानुसार डिसेंबरपर्यंत देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ४८.१ कोटीवर गेली आहे. जगभरात चीननंतर सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते भारतात आहे.

* जूनपर्यंत देशातील इंटरनेट युजरची संख्या ५० कोटीपर्यंत पोचण्याची शक्यता असल्याचेही अहवालात म्हटले आहे. देशातील १७० शहरामधील ६० हजार व्यक्ती आणि ग्रामीण भागातील ७५० गावातील व्यक्तीशी संपर्क साधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

* चीनने इंटरनेटच्या वापराला प्रोत्साहन देतानाच त्यावरील मजकूर मँडेरीन भाषेतच उपलब्द होईल. याची काळजी घेतली जाते. त्यामुळे चीनमध्ये इंटरनेट वापराचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

* इंटरनेटवर इंग्रजीनंतर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा म्हणून आज मँडेरीन ओळखली जाते. इंटरनेटवर उपलब्द असलेल्या एकूण मजकुराच्या तुलनेत भारतीय भाषांचे प्रमाण ०.१ टक्का इतके किरकोळ आहे.

* डिजिटल इंडिया साठी सरकार प्रयत्नशील, इंडिक इंटरनेट इकोसिस्टिमची गरज ग्रामीण आणि शहरातील दरी कमी होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.