गुरुवार, १५ मार्च, २०१८

फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश - १५ मार्च २०१८

फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश - १५ मार्च २०१८

* संयुक्त राष्ट्र संघटनेने बुधवारी [वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट-२०१८] सादर केला असून त्यात १५६ देशांच्या यादीत भारत १३३ व्या क्रमांकावर आहे.

* पण जगातील सर्वाधिक सुखी किंवा आनंदी देश म्हणून फिनलँडची निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार १५६ देशांच्या फिनलँड देश अग्रेसर ठरला आहे.

* विशेष म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्तान या यादीत ७५ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाकने ५ क्रमांकाची आघाडी घेतली असून तर भारताची मात्र घसरण झाली आहे.

* पाकिस्तानप्रमाणे भारताचे सर्व शेजारी देशही समाधानी देशांच्या यादीत पुढे आहेत. चीन ८६, भूतान ९७, नेपाळ १०१, बांगलादेश ११५, श्रीलंका ११६ व भारत १३३ व्या स्थानावर आहे.

* फिनलँडनंतर नॉर्वे, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, कॅनडा, न्यूझीलँड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, या देशांचा टॉप १० मध्ये समावेश आहे.

* तर इंग्लंड १९ व्या, अमेरिका १८ व्या स्थानावर आहे. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.

* आनंदी देशाची व्याख्या ठरविताना काही महत्वाचे निकष लावले जातात. प्रत्येक देशातील नागरिकांचं स्वतंत्र, सामाजिक समर्थन, विश्वास, आरोग्य आणि उत्पन्न या गोष्टी पहिल्या जातात.

* फक्त देशातील नागरिकच नाही, तर या देशाला भेट देणाऱ्या प्रवाशांचही जीवनमान पाहिलं जात. फिनलँड वासियाचे आयुष्य सर्वाधिक सुखी, समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी असल्याचं समोर आलं आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.