शुक्रवार, ३० मार्च, २०१८

इस्रोच्या जीसॅट - ६ए चे प्रक्षेपण - ३० मार्च २०१८

इस्रोच्या जीसॅट - ६ए चे प्रक्षेपण - ३० मार्च २०१८

* भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या शिरपेचात आज मानाचा आणखी तुरा खोचला गेला. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या जीसॅट-६ ए चे आज जीएसएलव्ही-एफ ०८ [जिओसिंक्रोनीस लॉन्च व्हेईकल] प्रक्षेपकाच्या साहाय्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

* यामुळे भारताची दुर्गम भागातील दूरसंचार क्षमता वाढणार आहे. तसेच याचा उपयोग सैन्यदलाना दुर्गम भागात होणार आहे.

* येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सायंकाळी ४.५६ वाजता [जीसॅट-६ए] चे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणानंतर १८ मिनिटांनी तो आपल्या कक्षेत स्थिर करण्यात आला.

* जीसॅट-६ए मध्ये स्वदेशी बनावटीचे विकास हे क्रायोजेनिक इंजिन बसविण्यात आले आहे. हे इंजिन आता चंद्रमोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे.

* जीएसएलव्ही चे १२ वे उड्डाण होते. त्यातील सहा उड्डाणामध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले आहे. इस्रोच्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे के सिवन यांनी घेतल्यानंतर हे पहिलेच प्रक्षेपण होते.

* जीसॅट-६ए ची वैशिट्ये - २००० किलो, १० वर्षे कार्यकाळ, २७० कोटी रुपये खर्च, उच्च क्षमतेचा ६ मीटर व्यासाचा एस बँड अँटिना, सिबॅन्ड फ्रीक्वेन्सीसाठी ०.८ मीटर व्यासाचा अँटिना, सॅटेलाईट फोनसाठीचा उच्च क्षमतेची उपकरणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.