बुधवार, २८ मार्च, २०१८

डेटा साक्षरतेत भारतीय कर्मचारी अग्रेसर - २८ मार्च २०१८

डेटा साक्षरतेत भारतीय कर्मचारी अग्रेसर - २८ मार्च २०१८

* डिजिटल प्रेरित आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून भारताचा विकास साधण्यात डेटा साक्षरतेची भूमिका महत्वपूर्ण असल्याचा निष्कर्ष डेटा विश्लेषणातील क्लिक या आघाडीच्या कंपनीने केलेल्या आशिया पॅसिफिक डेटा साक्षरता सर्वेक्षणातून अधोरेखित झाला आहे.

* व्यवसायाचे अधिक धोरणात्मक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संबंधित डेटाचा लाभ भारतीय व्यवसायिक कसा घेत आहेत याचे विवेचन या संशोधनात्मक सर्वेक्षणात करण्यात आले आहे.

* भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामावर डेटाचा वापर अधिकाधिक करण्यावर भर असतो. ८५% कर्मचार्यांनी सांगितले की तीन वर्षांपूर्वी ते करत होते त्यापेक्षा आज ते अधिक प्रमाणात डेटाचा उपयोग करत आहेत.

* जवळजवळ चारपैकी तीन जण ७२% आपल्या सध्याच्या नोकरीमध्ये आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा डेटा वापरतात. भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा वापरतात.

* भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा वापरतात. भारतातील कर्मचारी त्यांच्या नोकरीमध्ये डेटा आणि डेटा त्यांना काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करीत असल्याचे सांगितले.

* सर्वात जास्त डेटा साक्षरतेत भारत ४५% विरुद्ध क्षेत्रीय २०% आघाडीवर असून जपानमध्ये केवळ ६% कर्मचारी स्वतःला डेटा साक्षर मानतात.

* भारत ६४% ऑस्ट्रेलिया ३९% आणि सिंगापूर ३१% मधील सी-सीट आणि संचालक आपल्या डेटा साक्षरतेच्या पातळीबाबत अधिक आत्मविश्वास बाळगत असल्याचे या सर्वेक्षणातून निर्दशनात आले आहे.

* भारतातील ८८%, चीनमधील ७६%, आणि सिंगापूर येथील ७५% कर्मचाऱ्यांना त्यांचे नियोक्ते डेटा मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी साहाय्य करतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.