बुधवार, ७ मार्च, २०१८

पाकिस्तानात प्रथमच हिंदू दलित महिला बनली खासदार - ५ मार्च २०१८

पाकिस्तानात प्रथमच हिंदू दलित महिला बनली खासदार - ५ मार्च २०१८

* पाकिस्तान संसदेने वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटवर पहिल्यांदाच एक हिंदू दलित महिला खासदार म्हणून निवडून गेल्याची ऐतिहासिक घटना घडली.

* पाकिस्तान पीपल्स पार्टी अर्थात 'पीपीसी' कडून कृष्णाकुमारी कोल्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत बाजी मारत कोल्ही आता सिनेटवर गेल्या आहेत.

* मुस्लिमबहुल पाकमध्ये हिंदू दलित खासदार बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीपीपी ने कृष्णाकुमारी कोल्ही यांचे सिंध प्रांतातील अल्पसंख्याक जागेवरून नामांकन केले होते. शनिवारी सिनेटच्या ५२ जागासाठी मतदान झाले.

* या निवडणुकीत बाजी मारत कृष्णकुमारी कोल्ही यांनी इतिहास घडविला. सिनेटवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या हिंदू दलित खासदार निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या हिंदू दलित खासदार ठरल्या आहेत.

* त्यांची निवड महिला आणि अल्पसंख्याक समुदायाच्या दृष्टिकोनातून महत्वाची मानली जात आहे.  रताना भगवानदास चावला या प्रथम हिंदू खासदार म्ह्णून सिनेटवर गेल्या होत्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.