काही नवीन चालू घडामोडी - २६ मार्च २०१८
* तेलंगणा राज्य विधानसभेत राज्य भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले. ज्यामधून राज्यातील सर्व शाळांमध्ये तेलगू शिक्षण आणि तेलगू भाषेचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.
* ४ एप्रिल २०१८ पासून ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु होत असलेल्या २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय पथकामध्ये नेतृत्व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्यामध्ये देण्यात आले आहे.
* जगातील सर्वात उंच एअरपोर्ट स्लाईड, २४ तास मोफत सिनेमा, छतावर स्विमिंग पूल आणि सुंदर असे पार्क या सर्व गोष्टींनी सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला पुन्हा बेस्ट विमानतळाचा खिताब मिळाला आहे.
* केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांनी २२ मार्चला २०१८ हे ज्वारी-बाजरीचे राष्ट्रीय वर्ष [National Year of Millets] घोषित केले आहे.
* झारखंडच्या देवघर जिल्ह्यात प्लॅस्टिक पार्कची उभारणी करण्यात येणार असून हा पार्क १५० एकर क्षेत्रात १२० रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये अनेक पॉलिमर पिशवी, मॉल्डेड घरातले बैठकीचे सामान, पाण्याची बाटली, नळी मच्छरदाणी तयार केली जाते.
* १०६ वी 'भारतीय विज्ञान परिषद २०१९' जानेवारी २०१९ मध्ये बरकातुल्ला विद्यापीठ [भोपाळ मध्यप्रदेश] येथे आयोजित केली जाणार आहे. [फ्युचर इंडिया] सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाखाली परिषद भरवली जाणार आहे.
* नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे. भंडारी यांनी नेपाळी काँग्रेसने उमेदवार कुमार लक्ष्मी राय यांना पराभूत केले.
* एअर इंडियाचे एक विमान २२ मार्च रोजी पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राईलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले.
* अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा [मेस्मा] अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
* भारत आणि नेपाळदरम्यान असलेला पंचशील करारांतर्गत नेपाळहून वाहत येणारी शारदा नदीला यमुना नदीशी जोडण्याची योजना भारत आणि नेपाळ आखात आहे.
* ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी कवी केदारनाथ सिंह यांचे २१ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.
* भारतातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत जाहीर केली असून देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी आहेत.
* जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केम्ब्रीज अनॅलिटीका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली आहे.
* नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली हायकोर्टने सोनिया गांधी व राहुल गांधी हे भागधारक असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडला १० कोटी रुपये दोन टप्प्यात प्राप्तिकर विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा