शनिवार, ३१ मार्च, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३१ मार्च २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३१ मार्च २०१८

* तामिळनाडू कृषी विद्यापीठ [TNU] येथे अत्याधुनिक सुविधांसह किटक संग्रहालय उघडण्यात आले आहे. हे भारतातील पहिले कीटक संग्रहालय आहे. 

* केंद्र शासनाने एकर इंडियातून ७६% भागभांडवलाची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. विक्रीनंतर केंद्र शासनाकडे एअर इंडियाचा २४% भाग असणार आहे.  

* कृष्णस्वामी विजय राघवन यांची केंद्र शासनाने प्रधान वैज्ञानिक सल्लागार [Principal Scientific Advisor] पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

* इंदू भूषण यांची आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम [ABNHPM] च्या मुख्य कार्यकारी अधिकारी [CEO] पदी नियुक्ती करण्यात आली आहे. CEO पदावर त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असणार आहे. 

* इजिप्तचे वर्तमान राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी यांची राष्ट्रपती पदावर पुनर्निवड झाली आहे. 

* भारतात मारुती सुझुकी ही चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक कार निर्यात करणारी कंपनी ठरली आहे. त्यानंतर हुंदाई, फॉक्सवॅगन, आणि जनरल मोटर्स या कंपन्या आहेत. 

* सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती जवाद रहिम यांची राष्ट्रीय हरित प्राधिकरण [NGT] च्या कार्यकारी अध्यक्ष [acting chairman] पदी नियुक्ती केली आहे. 

* सिम्फनी ऑफ द सी हे जगातले सर्वात मोठे क्रूज जहाज प्रवाशांच्या सेवेत आणले गेले आहे. या सागरी प्रवासी जहाजाने भूमध्य समुद्रातील आपल्या पहिल्या सफरीची सुरुवात करण्यासाठी फ्रान्समधील सेंट नझीरचे शिपयार्ड सोडले.

* ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपंग टेबल टेनिसपटू वैष्णवी विनायक सुतार हिची निवड झाली आहे. चार ते पंधरा एप्रिल दरम्यान स्पर्धा होत आहे.

* केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने [सीबीडीटी] आधार आणि पॅन कार्ड जोडण्यासाठी अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढविली आहे.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात दिवसांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

* कोटक सुशासनाकरिता कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक यांच्या अध्यक्षतेखाली जून २०१७ मध्ये नेमलेल्या समितीच्या बहुतांश शिफारशी सेबीने स्वीकारल्या आहेत.

* भारतीय वंशाच्या अमेरिकेतील न्यायाधीश दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्क येथील फोजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.