रविवार, ४ मार्च, २०१८

बजरंग पुनियाला आशियाई स्पर्धेत कांस्यपदक - ४ मार्च २०१८

बजरंग पुनियाला आशियाई स्पर्धेत कांस्यपदक - ४ मार्च २०१८

* भारताचा कुस्तीपटू आणि माजी विजेता बजरंग पुनियाला यंदाच्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदकावर समाधान मानव लागल.

* बजरंग पुनियाने ६५ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. या दोन पदकासह भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ८ पदक कमावली आहेत.

* ज्यात एक सुवर्ण, एक रौप्य, आणि ६ कास्य पदकांचा समावेश आहे. २०१७ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.

* मात्र यंदाच्या स्पर्धेत जपानच्या डायची टकाटनीने बजरंगला ७-५ अशा फरकाने हरवलं मात्र रेपीचाच प्रकारात बजरंगला कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

* दुसरीकडे विनोद कुमारलाही उजबेगिस्तानच्या इख्तियार नवरोजने ६-३ असं हरवलं. मात्र इख्तियार अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे विनोदला पुन्हा रेपीचाच प्रकारात कास्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.