रविवार, ११ मार्च, २०१८

जगात यंदा विक्रमी तांदूळ उत्पादन - ११ मार्च २०१८

जगात यंदा विक्रमी तांदूळ उत्पादन - ११ मार्च २०१८

* अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा [२०१७-१८] जगभरात तांदळाचे उत्पादन १९ लाख टनांनी वाढून ४८.६ कोटी टन होईल. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

* तसेच यंदा भारतात तांदळाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे एकूण जागतिक उत्पादनात देखील वाढ होईल. अशी टिप्पणी देखील अमेरिकेने केली आहे.

* भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात तांदळाचे उत्पादन वाढून ११ कोटी टन होईल. अशी संस्थेने केली आहे.

* त्यानुसार २०१७-१८ साली भारतात ११ कोटी टन तांदळाचे उत्पादन घेण्यात आले होते. यंदा तांदळाचे अधिक उत्पादन घेण्यात आले होते.

* यंदा तांदळाचे अधिक उत्पादन झाल्यामुळे भारताच्या तांदूळ निर्यातीत देखील वाढ होऊ शकेल. असे अमेरिकेच्या कृषि विभागाचे म्हणणे आहे.

* विभागाच्या म्हणण्यानुसार यंदा भारत १.३ कोटी टनांची निर्यात होण्याची अपेक्षा विभागाने व्यक्त केली आहे. मागील वर्षी भारतातून १.२५ कोटी टन तांदूळ निर्यात करण्यात आला होता.

* तसेच संपूर्ण जगभरात २०१७-१८ साली ४.७३ कोटी टन तांदळाची निर्यात होईल. असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.