मंगळवार, २० मार्च, २०१८

कर्नाटकातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा - १९ मार्च २०१८

कर्नाटकातील लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा - १९ मार्च २०१८

* कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

* कर्नाटकातील जातीय समीकरण लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 

* लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय १९ मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे.  

* नागामोहन दास समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाआधी मंत्रिमंडळात सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा झाली. 

* कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ डी अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्ह्णून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागमोहन दास समितीने म्हटले होते. 

* स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची लिंगायत समाजाची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती. तसेच कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७% आहे. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९, आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.