गुरुवार, १५ मार्च, २०१८

स्टीफन हॉकिंग्स यांचा संपूर्ण जीवनपट - १५ मार्च २०१८

स्टीफन हॉकिंग्स यांचा संपूर्ण जीवनपट - १५ मार्च २०१८

* १९४२- ८ जानेवारी १९४२ ऑक्सफर्ड इंग्लंड फ्रॅंक आणि इसोबेल हॉकिंग या दाम्पत्यांचे स्टीफन पहिले अपत्य.
* १९५३ - सेंट अल्बान्स स्कुलमध्येच त्यांचे शालेय शिक्षण झाले. शाळेत असताना ते सर्वसाधारण विद्यार्थीच होते. तरी त्यांचे मित्र त्यांना आईन्स्टाईन म्हणत.
* १९५९ - भौतिकशास्त्राच्या पदवी शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश. खरे तर त्यांना गणित विषयात शिक्षण घ्यायचे होते. पण कॉलेजमध्ये तो विषय नसल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय निवडला.
* १९६२ - केम्ब्रिजच्या ट्रिनिटी हॉलमध्ये संशोधनास सुरुवात. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना मोटार न्यूरॉनचा आजार झाल्याचे निदान झाले.
* १९६४ - जेनी विल्डेने लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास व संशोधनाकडे वळण्यास त्याची मदत झाली.
* १९६५ - १४ जून रोजी स्टीफन आणि जेनी यांचा विवाह.
* १९६६ - 'प्रॉपर्टीज ऑफ एक्सपांडींग युनिव्हर्सेस' हा प्रबंध सादर करून पीएचडी मिळविली.
* १९६९ - तब्येत खालावल्यामुळे व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.
* १९७० - सेकंड लॉ ऑफ ब्लॅक होल डायनामाईक्स म्हणून ओळखला जाणारा सिद्धांत मांडला.
* १९७४ - कृष्णविवरातून एकप्रकारचे किरण उत्सर्जित होत असतात, हे त्यांनी दाखवून दिले.
* १९७८ - ऑक्सफर्ड मानद डॉक्टरेट बहाल.
* १९७९ - केम्ब्रिजला परतून ल्युकेशियन प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स पदावर रुजू.
* १९८५ - न्यूमोनिया झाल्यामुळे श्वासाचा त्रास. ट्रेकीयोटॉमीमुळे आवाज गेला. त्यांच्यासाठी डोके आणि डोळ्यांच्या हालचालीवर चालणारा स्पीच सिंथेसायझिंग प्रोग्रॅम तयार करण्यात आला.
* १९९० - स्टीफन आणि जेनी विभक्त.
* १९९५ - नर्स म्हणून काम करणाऱ्या इलेन मेसन हिच्याशी विवाहबद्ध.
* २००५ - शारीरिक स्थिती आणखी खराब. संवादासाठी गालावरच्या स्नायूंचा वापर सुरु.
* २००६ - दुसरी पत्नी इलेन हिच्याशी घटस्फोट.
* २००७ - मुलगी ल्युसी आणि हॉकिंग मिळून लहान मुलासाठी 'जॉर्जस सिक्रेट की टू द युनिव्हर्स' हे पुस्तक प्रकाशित केले.
* २००९ - आरोग्यविषयक समस्या अधिकच वाढल्या. स्वतः व्हीलचेअर चालवणे अशक्य झाले. श्वसनाचा त्रास बळावला.
* २०१० - त्यांच्या मौलिक संशोधनावर आधारित 'द ग्रँड डिझाईन' पुस्तकाचे प्रकाशन. यात जगाची निर्मिती देवाने केली या संकल्पनेला विरोध.
* २०१८ - १४ मार्च स्टीफन हॉकिन्स यांचा मृत्यू. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.