शनिवार, २४ मार्च, २०१८

आता गाई म्हशींना ११२ अंकी क्रमांक देण्याची घोषणा - २४ मार्च २०१८

आता गाई म्हशींना ११२ अंकी क्रमांक देण्याची घोषणा - २४ मार्च २०१८

* विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच आधार च्या माणसासाठीच्या सक्तीची यादी लांबत जात असताना आता केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी दुभत्या गायी म्हशीनाही आधार आधार प्रमाणेच एक १२ अंकी कोड क्रमांक देण्याची योजना पुढे रेटली आहे.

* बारा जातीच्या दुभत्या जनावरांचे संरक्षण हा यामागचा एक उद्देश असल्याचे सरकारने म्हटल्यामुळे या योजनेबाबत चर्चा सुरु आहे.

* मात्र इतक्या मोठ्या कृषिप्रधान देशात ही गणना कशी करणार याच्या निश्चित योजनेबाबत मात्र आनंदीआनंद दिसतो.

* दुभत्या गायी म्हशींना ओळख क्रमांक देण्याच्या या योजनेसाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. सुरवातीला ५० कोटींचा आकडा सांगण्यात आला होता.

* आजच्या घडीला ही रक्कम १४८ कोटीवर गेली आहे. यातही सरकारने केंद्र व राज्य यांच्यासाठी ६०ते४० अशी खर्चाची मेख मारल्याचे दिसते.

* या गायी म्हशींना [नकुल] आरोग्य कार्डे व पशुसंजीवनी योजनेचे लाभही देण्यात येतील.

* योजनेचा उद्देश - वैज्ञानिक प्रजननक्षमता वाढविणे, दुभत्या जनावरांची उत्पादकता वाढविणे, दूध आणि दुग्धजन्य उत्पादनात वाढ, वैद्यकीय उपचार वेळीच मिळवून देणे, रोगांचा प्रसार रोखणे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.