मंगळवार, १३ मार्च, २०१८

देशात ११ राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा - १३ मार्च २०१८

देशात ११ राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा - १३ मार्च २०१८

* देशात गाडगीळ-मुखर्जी आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात एकूण ११ राज्यांना विशेष दर्जा देण्यात आला आहे. आसाम, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा आहे.

* विशेष दर्जामुळे राज्याला केंद्राकडून ९०% अनुदान मिळते. व फक्त १०% रक्कम कर्जाद्वारे राज्याला उभारावी लागते.

* अन्य राज्यांसाठी हे प्रमाण अनुक्रमे ७० ते ३०% असते. याशिवाय औद्योगिक गुंतवणूकीसाठी  उत्पादन शुल्कात सवलत मिळते. अशा राज्यांना आर्थिक मदतीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने त्याची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होते.

* विशेष राज्याच्या दर्जासाठीचे निकष - डोंगराळ व दुर्गम प्रदेश, सीमारेषेवरील महत्वाचा भूभाग, आर्थिक मागास व मूलभूत सुविधांपासून वंचित भाग, आदिवासीबहुल प्रदेश.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.