मंगळवार, १३ मार्च, २०१८

शस्त्रास्त आयातीच्या बाबतीत भारत जगात सर्वप्रथम - १३ मार्च २०१८

शस्त्रास्त आयातीच्या बाबतीत भारत जगात सर्वप्रथम - १३ मार्च २०१८

* मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारताला शस्त्रास्त्र निर्मितीत अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. भारताला शस्त्रास्त्रसाठी अजूनही दुसऱ्यावर देशावर अवलंबून राहावे लागते.

* २०१३-२०१७ या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करण्याऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी १२% आयात एकटा भारत करतो.

* इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूट [IPRI] या संस्थेने सोमवारी जगभरातील देशाकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल सादर केला.

* यात २००८ ते २०१२ च्या तुलनेत २०१३ ते २०१७ या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

* भारत जगभरात शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशामध्ये अव्वलस्थानी आहे. भारताच्या पाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमें तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

* चीन, ऑस्ट्रेलिया हे देश पाचव्या व सहाव्या स्थानी आहे. तर अल्जेरिया सातव्या, इराक आठव्या, आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे.

* भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून भारतातील ६२% शस्त्रास्त्र हे रशियाकडून येतात. तर अमेरिकेकडून निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे.

* चीनला शह देण्यासाठी अमेरिका-भारतामधील संबंध सुधारत असून संरक्षन क्षेत्रात अमेरिकेचे योगदान वाढल्याचे सांगितले जाते.

* विशेष म्हणजे चीनने आता शस्त्रास्त्र निर्मितीवर भर दिल्याचे दिसत असून शास्त्रास्त्रांची निर्यात करणाऱ्या देशात चीन पाचव्या स्थानी आहे.

* चीनमधून शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतील ३५% वाटा पाकिस्तानचा आहे. तर बांगलादेश १९ टक्क्यासह दुसऱ्या स्थानी आहे. दरम्यान जगात संरक्षणावर सर्वाधिक खर्च अमेरिका करते.

* त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. अमेरिका संरक्षणावर ६०२.८ अब्ज डॉलरची तरतूद करते. चीनपेक्षा हे चारपट अधिक आहे. भारताने यंदा २०१८-१९ मध्ये संरक्षणासाठी २.९५ लाख कोटीची तरतूद केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.