शुक्रवार, ३० मार्च, २०१८

देशात जियो सर्वात वेगवान ४ जी नेटवर्क - ३० मार्च २०१८

देशात जियो सर्वात वेगवान ४ जी नेटवर्क - ३० मार्च २०१८

* रिलायन्स जियोने देशात सर्वात वेगवान फोरजी टेलिकॉम ऑपरेटर होण्याचा मान पटकाविला आहे. दूरसंचार नियामक ट्राय संस्थेने जानेवारी महिन्याचा अहवाल सादर केला असून त्यात रिलायन्स जियोच्या ऐनगर्दीच्या वेळी सरासरी डाउनलोडस्पीड २१.३ एमबीपीएस असल्याचे नमूद करण्यात आले. 

* प्रमुख स्पर्धक भारतीय एअरटेलच्या फोरजी स्पिडपेक्षा रिलायन्स जियोचा फोरजी स्पीड दुप्पट आहे. भारतीय एअरटेलचा सरासरी डाउनलोड फोरजी स्पीड ८.८ एमबीपीएस आहे. 

* तसेच वोडाफोन आणि आयडिया सेल्युलर कंपन्यांच्या सरासरी डाउनलोड स्पीड अनुक्रमे ७.२ आणि ६.८ एमबीपीएस आहे. 

* मात्र फोरजी अपलोड स्पीडमध्ये आयडिया कंपनीने प्रथम स्थान पटकाविले आहे. ग्राहक जेव्हा व्हिडीओ पाहत असतात किंवा इंटरनेट सर्फ करत असतात. तेव्हा डाउनलोड स्पीड अत्यंत महत्वाचा असतो. कारण तेव्हा जलद काम व्हावे अशी ग्राहकाची अपेक्षा असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.