शनिवार, ३ मार्च, २०१८

वेतनवाढीमध्ये आशिया पॅसिफिक खंडात भारत पहिल्या स्थानी - ३ मार्च २०१८

वेतनवाढीमध्ये आशिया पॅसिफिक खंडात भारत पहिल्या स्थानी - ३ मार्च २०१८

* या वर्षांमध्ये आशिया पॅसिफिक खंडात भारत वेतनवाढीच्या बाबतीत अव्वल ठरणार आहे. एयॉन इंडियाने वेतनवृद्धीबाबत केलेल्या पाहणीमध्ये हा निष्कर्ष काढला आहे. 

* ९.४% इतकी वृद्धी भारत साधणार असून त्याखालोखाल जीन ६.७ टक्के वेतनवृद्धी करून दुसऱ्या क्रमांकावर असेल. असे या पाहणीतून आढळून आले. 

* विविध अशा एकंदर उद्योगामध्ये असलेल्या १००० कंपन्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. गेल्यावर्षी भारतातील कंपन्यांनी ९.३% वेतनवाढ दिली होती. २०१६ च्या तुलनेत ती कमी होती. २०१८ मध्येही ही वाढ जवळजवळ तितकीच असून ती ९.४ टक्के इतकी आहे. 

* मात्र कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी ही वाढ आहे इतकेच वेतनवृद्धीमध्ये अनेक बाबी वा घटक वाढलेले आहेत. त्यात असणारी अनेक बारकाईच्या बाबी पहिल्या तर त्यात कंपनीचा आकार, संबंधित समांतर अशा उद्योगातील व्यवसायिक गती, तसेच आवश्यक अशा बुद्धिमत्ताची स्थिती व स्वाभाविकपणा, यावर अवलंबून असणारी कार्यक्षमता यांचा समावेश आहे. 

* मुळात सर्व क्षेत्रामध्ये व कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रदर्शनात भर पडत असून अत्युच्च अशा कार्यक्षमतेसाठी १५.४ टक्के वेतनवाढ मिळत असते. 

* साधारण कार्यक्षमतेसाठी असणाऱ्या टक्केवारीनुसार ही वाढ १.९% अधिक आहे. अर्थात सर्वोच्च अशा या कर्मचाऱ्यांच्या वेतनवृद्धीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवृद्धीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या टक्केवारीतही घट झाली असल्याचे दिसते. 

* वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकांच्या वेतनात होणारी वृद्धी सातत्याने घट होत आहे. मात्र व्यवसायिक सेवा, ग्राहकसंलग्न इंटरनेट कंपन्यास ग्राहकोपयोगी कंपन्या आदीमधील कर्मचाऱ्यांना मात्र खुशखबर दिसते, ती म्हणजे त्यांच्या वेतनवृद्धीमध्ये या वेळी दोन आकडी वाढ टक्केवारीत दिसून येईल. असा अंदाज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.