बुधवार, २८ मार्च, २०१८

माहिती तंत्रज्ञानाच्या डेटा सुरक्षासाठी बी. एन. श्रीकृष्ण समितीची स्थापना - २८ मार्च २०१८

माहिती तंत्रज्ञानाच्या डेटा सुरक्षासाठी बी. एन. श्रीकृष्ण समितीची स्थापना - २८ मार्च २०१८

* डेटा सुरक्षेच्या विविध मुद्यावर एक स्पष्ट कायदा असावा आणि त्याच्या कक्षेत तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या आणि डेटाशी छेडछाड करणाऱ्याना आणावे, या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मागील वर्षी ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश बी. एन श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समितीची स्थापना केली होती.

* सध्या सरकारकडे याबाबत कोणताही कायदा नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई करता येत नाही.

* यात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे तत्कालीन अतिरिक्त सचिव अजय कुमार यांच्याशिवाय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन आणि आधार प्राधिकरणाने सीईओ अजय भूषण पांडेय यांचा समावेश करण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.